Nirmala Sitharaman Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष, जाणून घ्या कोणत्या गोष्टी मांडल्या
आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केल आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत, मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत. या बजेटमध्ये पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचे मुद्दे
1. जहाज निर्मिती क्षेत्राकडे विशेष लक्ष
2. २५ हजार कोटी खर्च करून मेरिटाईम बोर्ड स्थापना
3. अतिविशाल जहाजांचाही योजनेत समावेश
4. उडान योजना नव्याने स्थापन, पुढील १० वर्षात १२० नवी ठिकाणं जोडणार
5. नव्या उडान योजनेत पूर्वोत्तर राज्यांकडे विशेष लक्ष
6. जहाज निर्मिती 4 क्षेत्राकडे विशेष लक्ष
7. ५० नवी पर्यटन स्थळं विकसित करणार
8. पर्यटनस्थळ विकासातून नवा रोजगार
9. भारतात उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांनाही व्हिसा सोय
10. हील इन इंडिया योजना मेडिकल टूरिझमसाठी
11. महाबोधी आणि विष्णूपद मंदिरासाठी खास कॉरिडोअरची निर्मिती केली जाणार आहे.
12. तसेच नालंदा टूरिस्ट क्षेत्र म्हणून विकासित केले जाणार
13. ओडिशातील समुद्रकिनारे तसेच इतर धार्मिक स्थळांना आणखी देशपातळीवर नवे पर्यटन मिळवून देणार आहे.